मेहकर : महाबिज कंपनीचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन निघून आली नाही यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. मेहकर तालुक्यातील सावरखेड बु. शिवारातील शेतकरी दादाराव पुंडलिक जाधव यांच्या चार एकर जमीन मधील सोयाबीन बियाणे निघाले नाही.
त्यांनी खामगाव येथील गायकवाड कृषी केंद्र यांचेकडून चार बॅग महाबीज बियाणे खरेदी केले होते, सर्व कागदपत्र, पावती बिलाची तपासणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की दोन महाबीज कंपनीच्या बॅग आहे, व दोन बॅग महाबिज कंपनीच्या नावाने बनावट आहे अशी माहिती महाबीज चे प्रतिनिधी यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना नुसकान भरपाई देण्यात यावी व बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.