शेगाव: महाआवास अभियान कार्याल ग्रामीण सन २०२१-२२ अंतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था/ व्यक्तीना महाआवास अभियान ग्रामीण २.० पुरस्कार २० ऑक्टोबर रोजी विभागस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ विभागीय आयुक्त अमरावती यांचे शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये शेगाव पंचायत समितीला महाआवास अभियान ग्रामिण २.० अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुक्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. कार्यालय, अमरावती येथे आयोजीत करण्यात आलेला होता. सदर विभागस्तरीय सभारंभामध्ये अमरावती विभागातील महाआवास अभियान ग्रामिण २.० अंतर्गत राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘सर्वोत्कृष्ट तालुका’ या प्रकारात व्दितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देवून सतिष देशमुख, गटविकास अधिकारी, पं.स. शेगांव यांना गौरविण्यात आले आहे.पंचायत समिती पंचायत समिती शेगाव व्दारे आवास अभियानामध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल विभागीय स्तरावर मिळालेला पुरस्कार हा तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांनी केलेल्या सहकार्य व योगदानामुळे मिळाला असून तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना समर्पित केल्याचे प्रतिक्रिया सतिष देशमुख गटविकास अधिकारी यांनी यावेळी दिली. तसेच सरपंच संघटना तालुकाध्यक्ष रामेश्वर थारकर व ग्रामसेवक संघटना अध्यक्ष विकास वैराळ यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सतिष देशमुख गटविकास अधिकारी यांचेकडुन गौरव करण्यात आला