December 27, 2024
ब्लॉग

मला काही बोलायचं आहे

एक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब आजी-आजोबा, आई बाबा आणि दोन मुले असा सुखी परिवार त्यातच आपल्याला एक मुलगी असावी अशी आई-वडिलांची मनीषा अशा समाधानी कुटुंबात जन्माला येते माझ्यासारखी दिव्यांग मुलगी दिव्यांगत्व असे कि, सर्वांनी पाहतात धक्का सुखाचा नव्हे तर दुःखाचा कारण ती जन्माला येणारी मुलगी चक्क दोन्ही हातांनी अधू एक हात तर नाही आणि दुसरा असून अर्धा आणि त्याला फक्त दोन बोटे असतात. ही मुलगी म्हणजे शारदा महादेव हागे माझे गाव सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जगदंबाचा मातेचा वरदहस्त असलेले वान नदीच्या सुंदर किनारा निसर्गरम्य ठिकाणी असे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड नावाप्रमाणे काही वान असलेले माझे गाव आहे
मी जन्म घेतला का गावभर चर्चा पसरले पूर्ण गाव पाहायला आले सर्वांच्या डोळ्यात होती ती फक्त माझ्याबद्दलची दया त्यात प्रेम नावालाही नव्हते कारण माझ्या सारखी मुलगी आमच्या पंचक्रोशीत हे जन्माला आलेली नव्हती जन्मतर घेतला इथूनच सुरू झाला माझा जीवनाचा संघर्ष कारण घरातली काही वडीलधारी यांनी तर मला तेव्हा चक्क मारण्याचा सल्ला माझ्या आई वडिलांना दिला. पण थोर माझे आई-वडील मला जन्म दिला त्यांनी सर्व समाजाचा नातेवाईकाला बाजूला ठेवून माझा सांभाळ माझे पालनपोषण एखाद्या सामान्य मुलासारखे केले मला कोणतीही कमतरता भासू न देता केले माझ्या परिवारात माझे बालपण चांगले जात होते.
मी वयाच्या सहाव्या वर्षात गेली तेव्हा माझ्या घरच्या पुढे प्रश्न निर्माण झाला तो माझ्या शिक्षणात शिक्षणाचा बरेच लोक म्हणत होते की मला हातच नाही तरी हिला शाळेत पाठवून काय फायदा? कारण या वयात मला स्वतःची कामे करता येत नव्हती माझ्या प्रत्येक कामासाठी मात्र आई आणि आजी यांची मदत घ्यावी लागत असेल तरी माझ्या वडीलांनी या संकटांना बाजूला ठेवून मला गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल केले दाखल केले त्यांना आलेले कडू अनुभव जेव्हा ते माझ्याशी हितगुज करतात तेव्हा समजते ती समाजामध्ये दिव्यांग बद्दल आजही जशी पाहिजे तशी जनजागृती झालेली दिसत नाही कारण हे काही याचे पूर्वीचे पाप किंवा पुण्य असे काही नाही .वैद्यकीय दृष्ट्या अनुवंशिक आलेल्या या कारणामुळे येऊ शकते. विशेष शाळा तेव्हा फक्त जिल्ह्याच्या टिकाणी होते व घरच्यांची तेवढी मानसीचा नसल्यामुळे माझे प्राथमिक शिक्षण वानखेड येथील जिल्हा परिषद शाळेत संपूर्ण झाले सुरुवातीला मला शाळेत संघर्ष करावा लागला कारण सर्वसामान्य म्हटली की सर्व मुले खोडकर, बंड शाळेमध्ये सुरुवातीला शाळेतील मुले मला चिडवत परंतु यामध्येही मला माझ्या दोन तीन मैत्रिणी मिळाल्या आणि त्यांनी माझे आत्मबल आणखी वाढवले मला शाळेतील कोणत्याही समस्यांना आव्हानांना माझ्या मैत्रिणी मदत करत असत आणि माझ्याशी शिक्षण सुरू झाले माझे शिक्षण घेण्याची जिद्द पाहून सर्वांनी मला हळूहळू स्विकारले. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला शिक्षकांनी मला सहकार्य केले आता माझ्या आयुष्यातील ढग स्वच्छ झाले होते व ढगातील धूके जाऊन स्वच्छ कोरडे ऊन पडले होते

                     धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की
                       जीवनात रस्ता दिसत नसेल तर
                      दूर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ असते
                       एक- एक  पाउल टाकत चला
                    रस्ता आपोआप मोकळा होऊन जाईन

बघता बघता सर्व संकटे झुगारून मी दहावी उत्तीर्ण झाली पुढे मला पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागले जवळच असलेल्या वरवट माझी बारावी व ग्रॅज्युएशन झाले. पुढे मला माझे स्वप्न पूर्ण कराचे मला शिक्षिका होऊन विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे हा माझा मानस आहे म्हणून मी अमरावती विशेष डीएड पूर्ण केले मला माझ्यासारखे अनेक बांधव जवळून पाहण्याचा अनुभव आला शिक्षाणतर असे वाटले होते आपल्याला सरकारी नोकरी की संधी येईल कारण सर्वांचे म्हणणे होते कि अपंगांच्या जागा राखीव असतात पण प्रत्यक्षात जेव्हा मी लढायला निघाले तेव्हा त्यामध्ये सत्य समोर आले तात्पुरत्या स्वरूपाच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या करणे चालु ठेवले गावांमध्ये मुलांचे शिकवणी वर्ग आजही चालू आहे फक्त आशा आहे की सरकारी नोकरी कधी मिळेल याची.असो
कधीकधी मला मनात विचार येतो खरंच मी जर थांबले असते दिव्यांग म्हणून बाजूला राहिले असते तर आज माझ्या जागा एखाद्या कोपऱ्यात आडोशाला मरणाची वाट पाहत असणाऱ्या मुली सारखी झाली असती. पण माझे शिक्षण हेच माझे सर्वस्व आहे माझ्या शिक्षणामुळे मी सक्षम होऊ शकली व समाजामध्ये ताठ मानेने जगण्याचे मला माझ्या शिक्षणाने मला प्रदान केली मी माझ्यासारख्या सर्व मुलींना सांगू इच्छितो की ईश्वरानी आपल्याला जन्माला घातले पण आपल्याला काही ना काही गुण दिलेले असतात गरज आहे हे ओळखण्याची. आज समाजात खूप दिव्यांग काहीना तर घरातूनच खराब वागणूक देण्यात येते.त्यांना जगू द्या सन्मान , प्रेम द्या त्यांच्याशी हेटाळनाही करू नका त्यांच्या या सवलती सरकारने दिले आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या जिथे त्यांना आरक्षण आहे.त्याचे हक्क मारू नका, दिव्यांनो उठा व आपणही सर्वसामान्य आहोत स्वताला वेगळे समजू नका स्वताचे जीवन सन्मानाने जगा व आपल्यासारख्या ला जगू द्या. मी जीवनात खूप संघर्ष केला आहे व यश मिळवले आहे मी अजूनही ध्येय पूर्तीसाठी संघर्ष करत राहील आणि माझे ध्येय गाठू शेवटी एवढेच सांगू इच्छिते की

                           जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष
                           करावा लागत तो  तर नशीब समजा 
                           कारण ईश्वर संघर्ष करण्याची संधी फक्त
                          त्यांनाच देतो,ज्यांच्यामध्ये क्षमता असते

                                                               

                                                             कु.शारदा महादेव हागे
                                                                                                            
                                                            बि.ए. डी एड.(स्पेशल)
                                                                                                                
                                                               विशेष शिक्षिका
                                                                                                           

Related posts

PPE सूट घातल्यानंतर सहा-सात तास खाणं तर सोडाच पाणी सुद्धा पिता येत नाही..

nirbhid swarajya

दाल फैल भागातील महिलांचा नगरपरिषद वर मोर्चा…

nirbhid swarajya

कोरोनाने आपल्याला दिलेली देणगी जपावी लागेल..

nirbhid swarajya
error: Content is protected !!