November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ

भालेगाव सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा…

पिंपळगाव राजा: पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचयात भालेगाव बाजार येथील सरपंच संतोष श्रीकृष्ण इंगळे यांचेवर पिंपळगांव राजा पोलिसांत विनयभंगासह इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने परिसरातील स्थानिक राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७.३० वाजता भालेगाव येथील एक महिला शेतमजुरी करण्यासाठी रस्त्याने जात असताना बसस्टॉपवर आरोपी सरपंच संतोष श्रीकृष्ण इंगळे यांनी त्या महिलेचा वाईट उद्देशाने हात पकडून लगट करण्याचा प्रयत्न केला, तसेच लोट पाट करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.अशी फिर्याद महिलेने पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून दाखल केली.तक्रारी वरून पिंपळगाव राजा पोलिसात आरोपीविरुद्ध कलम ३५४,३५४ (ए), ३२३, ५०४, ५०६ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास ठाणेदार सतीश आळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहेकॉ गजानन सातव करीत आहेत.

Related posts

भरधाव स्कॉर्पिआच्या धडकेत बापलेकासह एकाचा मृत्यू

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये ही ते करतायेत गौ-सेवा

nirbhid swarajya

पीक कर्जाची बँक व्यवस्थापकाची पॅन कार्डची सक्ती

nirbhid swarajya
error: Content is protected !!