खामगांव: येथील भारतीय जनता पार्टी चे शहर चिटणीस कृष्णा ठाकुर यांनी आपल्या पदाचा राजीनामा खामगांव शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांच्या कडे सुपुर्द केला. आपल्या कामाच्या व्याप्तीमुळे पक्षाने दिलेल्या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे सदर राजीनामा देत असल्याचे त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात सांगितले आहे.

आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर कृष्णा ठाकुर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे. कृष्णा ठाकूर यांनी राजीनामा जरी दिला असला तरी हा राजीनामा वरिष्ठांकडून मंजूर होतो का हेही पाहावे लागेल.