खामगाव : भाजपा खामगाव तालुका महिला आघाडीच्या वतीने भाजप कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि प सदस्या सौ आशाताई चिमनकार होत्या, तर प्रमुख उपस्थितीत महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सदस्य सौ अनिताताई देशपांडे, तालुकाध्यक्ष माजी प स सभापती सौ उर्मिलाताई गायकी,प स सभापती सौ रेखाताई मोरे, उपसभापती सौ शीतल मुंढे, जि प सदस्या सौ जयश्रीताई टिकार, सौ स्वातीताई देवचे , सौ रेखाताई महाले, प स सदस्या सौ दुर्गाताई महाले, सौ रत्नाताई डिक्कर, सौ प्रज्ञा कुलकर्णी, सौ जयश्री वाघ,आदी प्रमुख मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सर्वप्रथम पदाधिकारी महिलांच्या हस्ते लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, त्यांना अभिवादन केल्यानंतर ग्रामीण भागातील आलेल्या सर्व महिलांना वाण देऊन हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला.
सर्वांना तीळकुळ वाजत करून नंतर उघण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुका सरचिटणीस सौ श्रद्धा धोरण, सौ रेखाताई घोंगे, सौ प्रतिभा बघाडे, सौ लता अंभोरे, सौ शिल्पा वाघमारे, सौ शारदा दांडगे, सौ छाया गव्हाळे, सौ उषा काटोले, सौ दीपाली अडकणे, सौ पूजा देशमुख, सौ वेणू शेंगोकार, सौ संगीता काटकर, सौ सीमा रोकडे, सौ शारदा राखोंडे, सौ सुलभा वाडेकर, सौ सुषमा ठाकरे,सौ भक्ती वाणी, सौ लता ताठे, सौ वैशाली खेडकर, सौ मंदा गुलदे, सौ वनिता वाघमारे, सौ आशा कारांगले, सौ रेखा शेळके, सौ वर्षा घोगले, सौ योगिता काळे, सौ सुनीता पवार , सौ स्वाती बोनडे, प्रणिता देवगिरकर, वैशाली जाधव, यांचेसह शेकडो महिला या कार्यक्रमाचा लाभ घेतला. तत्पूर्वी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी , तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी महिलांच्या संघटन सप्ताह बद्दल माहिती दिली व प्रत्येक गावात महिला आघाडी ग्राम शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रत्नाताई डिक्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्षा सौ उर्मिलाताई गायकी यांनी केले.