ठिक ठिकाणी घेतली योग शिबिरे
खामगाव : भाजपच्या वतीने आज संपुर्ण जिल्ह्यात ठीक ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिरे घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक शहर व तालुकानिहाय मंडळात किमान दोन ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. उत्तम योग प्रशिक्षकांकडून उपस्थित नागरिकांना योग प्राणायमाचे धडे देण्यात आले. खामगाव शहरात स्वामी विवेकानंद न प शाळा क्रमांक ९ येथे भाजप शहर व पतंजली च्या वतीने योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आमदार अँड आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय व लोकनेते भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी आमदार अँड फुंडकरांच्या हस्ते पतंजली चे योग प्रशिक्षक किरणजी रेठेकर व शाहजी यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात आमदार अँड आकाश फुंडकर यांच्यासह भाजप प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागर फुंडकर, नगराध्यक्षा सौ अनिताताई डवरे, भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, न प गटनेते राजेंद्र धानोकार, नगरसेविका सौ संतोष पुरोहित, सौ शिवानी कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, जितेंद्र पुरोहित, वैभव डवरे, सुभाष इटणारे, संदीप राजपूत, आदींनी योग प्राणायमाचे धडे घेतले.
तसेच भाजप खामगाव ग्रामीण मंडळ व क्रीडा भारतीच्या वतीने घाटपुरी रोड वरील गौरक्षण संस्थान येथे आयोजित योग शिबिरात सुद्धा आमदार अँड फुंडकर यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते क्रीडा भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रसन्नजी हरिदास, विभागीय संयोजक दत्ताजी कंझारकर, जिल्हा उपाध्यक्ष अँड उदयजी आपटे, व योगगुरू प्रा. अनिलजी मुलांडे यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात आमदार अँड आकाश फुंडकर यांचेसह प स सभापती सौ रेखाताई मोरे, जि प सदस्या सौ जयश्रीताई टिकार, प स सदस्या सौ दुर्गाताई महाले, घाटपुरी सरपंचा सौ संगीताताई ढोले,मुन्नाभाऊ दळी, विजय महाले, विनोद टिकार, अँड संजय बडगुजर, गोपाल ढोले, नाना धंदर, सुनील वानखडे, रमेश रहाणे, जगन हिवरकार, निखिल तायडे आदींनी योग प्राणायमाचे धडे घेतले. प्रशासनाने दिलेल्या कोरोनाचे नियमाचे पालन करून योग शिबिरे उत्साहात पार पडले.