खामगांव : बोगस बियाणे विक्री प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी पकडलेल्या दोघांना 3 जून रोजी खामगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन जून रोजी दुपारी एम एच 46 बिक्यू 2287 मालवाहू गाडी बोरजवळा शिवारात आरोपी जगन्नाथ गणपत राहणार दरेगाव तालुका सिंदखेड राजा व रवींद्र 30 वर्ष राहणार मोहदरी तालुका मेहकर हे दोघे बोगस कपाशी बियाणे व इतर बियाणे विक्री करीत असल्याची गुप्त माहिती खामगाव तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी व नांदुरा येथील तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम अंगाईत व कृषी सहाय्यक योगेश पाटील यांना मिळताच त्यांनी आपल्या टीम समवेत सापळा रचून दोघांना रंगेहात बोगस बियाणे विक्री करतांना पकडले होते व या कारवाईत कपाशीच्या 36 बॅग, सोयाबीनच्या 6 बॅग, चवळी 1 बॅग, पावती पुस्तके, स्टॅम्प पॅड व विविध कंपन्यांचे शिक्के पोलिसांनी जप्त केले होते या प्रकरणी कृषी विभागाने पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली व त्यांच्यावर पोलिसांनी विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले व त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी मिळावी म्हणून न्यायालयात मागणी केली त्यामुळे न्यायालयाने त्या 25 जूनपर्यंत पोलिस या प्रकरणी या दोघांकडून आणखी काय माहिती बाहेर येते हे पाहणे गरजेचे आहे. तसेच पुढील तपास ठाणेदार सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश धोत्रे व कर्मचारी करीत आहेत.
previous post