April 18, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेतकरी

बुलढाणा उपजिल्हाधिकारी, लिपिक व एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना बुलडाणा एसीबी जाळ्यात…

बुलढाणा: जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मध्यम प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची शेतजमिनी प्रकल्पात जाते अश्या बाधित शेतकऱ्यांना या कार्यालयाच्या माध्यमातून मोबदला दिला जातो.बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पात हिंगणा ईसापूर ता नांदुरा येथील एका शेतकऱ्याची जमीन गेली होती त्याचा मोबदला देण्याच्या नावाखाली बुलडाणा मध्यम प्रकल्प कार्यालयच्या उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी एकूण मोबदल्याचे १० टक्के अर्थात २ लाखाची मागणी केली होती व त्याला कार्यालयात कार्यरत लिपिक खरात यांनी प्रोत्साहन दिलं होतं.

तसेच एड अनंता देशमुख यांनी मध्यस्थी केली होती.त्या शेतकऱ्याने याची तक्रार बुलडाणा एसीबी कडे केली असता आज २८ दिसेम्बर रोजी सापळा रचून मध्यम प्रकल्प कार्यालय परिसरात उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,लिपिक नागेश खरात यांच्यासाठी १ लाखाची लाचेची रक्कम स्वीकारतांना एड अनंता देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आले.या कारवाई नंतर पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपिक खरात व एड देशमुख यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर बुलढाणा जिल्हा महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

Related posts

५०१ भोपळे सुकवुन तयार केले पाणीपात्र

nirbhid swarajya

चाकूचा धाक दाखवून पैसे लुटले;आरोपीला अटक

nirbhid swarajya

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने टरबुज फोडुन नोंदविला निषेध

nirbhid swarajya
error: Content is protected !!