April 19, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

बुलडाण्यात महिला पोलिस कर्मचारीचे प्रायव्हेट फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

व्हायरल करणाऱ्या मोबाईल नंबरवर गुन्हा दाखल

बुलडाणा : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचारीचे चक्क प्रायवेट फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणी पिडीत महिला
पोलिस कर्मचारीने दिलेल्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दलात कार्यरत एका महिला कर्मचारीचे अंघोळ करतांनाचे प्रायवेट फोटो तिच्या ईमेल आडीवर सेव्ह होते. हा ईमेल आयडी हॅक करुन जवळपास ३० प्रायवेट फोटो पिडीत महिला पोलिस कर्मचारीच्या मैत्रिणीच्या मोबाईल नंबर वर ७०५८७२५५०८ या क्रमांकाने अश्लील संदेश लिहून पाठविण्यात आले.

ही बाब पिडीत पोलिस महिला कर्मचारीच्या लक्षात येताच तिने बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरुन अज्ञात मोबाईल धारक क्र. ७०५८७२५५०८ असलेल्या आरोपीवर विनयभंगची कलम ३५४, ३५४ (ड), आयटीअ‍ॅक्टचे ६६ (सी), ६६ (ई), ६७ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सायबरसेलकडे वर्ग करण्यात येणार आहे. तपासअंती पिडीत महिला पोलिस कर्मचारीचे नग्न फोटो कोणी व्हायरल केले हे समोर येणार आहे. याचा पुढील तपास दत्तात्रय नागरे हे करीत आहे. तर पिडीत महिला पोलिस कर्मचारीचे नग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यामाघे एका पोलिस कर्मचाऱ्याचा हाथ असल्याची चर्चा बुलडाणा शहरात रंगली आहे.

Related posts

दाल फैल भागातील महिलांचा नगरपरिषद वर मोर्चा…

nirbhid swarajya

पत्रकारांना कोरोना ची लागण

nirbhid swarajya

पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

nirbhid swarajya
error: Content is protected !!