November 20, 2025
अमरावती आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शिक्षण शेतकरी

बुलडाणा जिल्‍ह्यात आजपासून संचारबंदी लागू

आज १९९ कोरोना पॉझीटीव्ह रूग्णू आढळून आल्याने चिंता वाढली.

नियम व अटीचे पालन न केल्यास कारवाईच्या सूचना

बुलडाणा : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. याचे कारण म्हणजे आज सर्वाधिक म्हणजे 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले असून शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बुलडाणा, एस. रामामुर्ती यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, शासन आदेश दिनांक 29/01/2021 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) मधील तरतुदीनुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करून बुलडाणा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी लागू केली आहे.

अश्या आहे आदेशातील प्रमुख बाबी

  1. शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारीत करण्यात आले असून त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
  2. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ ५० व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
  3. लग्नसमारंभाकरिता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्‍थित राहता येईल. लग्नसमारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
  4. लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.
  5. हॉटेल/ पानटपरी/ चहाची टपरी/चौपाटी री सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासन यांनी नियंत्रण ठेवण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक/दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येईल.
  6. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था/ थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये/ कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील
  7. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (महानगरपालिका / नगरपरिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना त्याच स्तरावरुन करुन गर्दीस प्रतिबंध करण्यात यावा.
  8. जिल्ह्यामधील इयत्ता ५ वी ते ९वी पर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि.२८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
  9. या कालावधीत ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्याला अधिक यावा.
  10. खाजगी आस्थापना / दुकाने या ठिकाणी मास्क /फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलमध्ये सुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनी भागात बॅनर / फलक लावणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी.
  11. हॉटलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात. तसेच दर्शनी भागात फलक लावण्यात यावा.

१२ अतिथी / ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स / मास्क/हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.

१३ यापूर्वी कोविड-१९ चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये या करिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उललंघन होणार नाही या बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.

१४ जिल्‍ह्यातील सर्व आठवडी बाजार सायं.४ नंतर बंद ठेवण्याचे आदेश आहे

Related posts

आयपीएल वर जुगार : शिवराज फॉर्म हाऊस वर पोलिसांचा छापा

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त २१ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

nirbhid swarajya

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मद्दतीकरीता गायगाव येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

nirbhid swarajya
error: Content is protected !!