कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाय
बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील काही नगर पालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील प्रमुख मार्गावर फवारणी करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष फवारणी यंत्र तयार केले आहे. यामध्ये स्प्रेयर मशीनद्वारे सायंकाळच्या वेळी शेगाव, बुलढाणा आणि खामगावातील प्रमुख रस्त्यांवर साबण आणि ब्लिचिंग पावडरच्या पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. हवेमध्ये असणारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी साबणाचा अथवा ब्लिचिंग पावडरच्या पाण्याची फवारणी करण्यासाठी नगर पालिकेच्यावतीने यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यामध्ये शेगाव, खामगाव आणि बुलढाणा शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यावर साबण आणि ब्लिचिंग पावडरच्या पाण्याची फवारणी प्रायोगिक तत्वावर करण्यात येत आहे. जनजागृती मोहीम बरोबरच विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता हवेतील विषाणू रोखण्यासाठी फवारणी करण्याचे पाऊल उचलण्यात आले.