November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा राजकीय शेतकरी संग्रामपूर

बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने बँके कडे केली 5.5 कोटी कर्ज मागणी…

शेतीतून प्रगती होत नसल्याने शेतातच पंच तारिका हॉटेल बांधणी साठी केली कर्जाची मागणी…

बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील एका अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया कडे प्रत्येकी ५.५० कोटीच कर्ज मागितलं आहे ,तसा अर्ज या शेतकऱ्याने बँकेकडे दिला आहे ,यामुळे मात्र बँक अधिकारी ही चक्रावून गेले आहेत. या तरुणाने म्हटलं आहे की ,मी अल्पभूधारक शेतकरी असून मला शेतीतून काहीही प्रगती करता आली नाही , मी अनेक व्यवसाय करून बघितले पण मला त्यात यश आलं नाही. म्हणून मला पंचतारांकित हॉटेल बांधायचं असून सध्या देशात निवडणुकीच वातावरण असलं की पंचतारांकित हॉटेलचा व्यवसाय जोमात असतो . निवडणूक आली की राजकीय पक्ष हे माझ्या भागातील ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिती ,जिल्हा परिषद सदस्य यांना माझ्या हॉटेल मध्ये आश्रयास ठेवतील व त्यातून मला उत्पन्न मिळाले की मी बँकेच कर्ज परतफेड करेल….!जरी या तरुण शेतकऱ्याने अशक्य अस कर्ज मागितलं असेल तरी यातून मात्र आपल्या व्यवस्थेचं अपयश नक्कीच दिसून येत आहे.

Related posts

खामगांव पंचायत समिती समोर संगणक परिचालकाचे निषेध आंदोलन

nirbhid swarajya

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोड मध्ये

nirbhid swarajya

गँस सिलेंडर डिलेव्हरी करणाऱ्यांना ऑनलाईन खात्यांचे टार्गेट

nirbhid swarajya
error: Content is protected !!