खामगाव : हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गेरू गावातील रहिवासी सौ.मंदा सुनिल बटवाडे (४१) या महिलेने हिवरखेड पोलिस स्टेशनला आज १७ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, माझा भाऊ मोतीसिंग हरीराम खसावत हा काल १६ मार्च रोजी दुपारी २.३० वा.च्या सुमारास मद्यपान करून माझ्या घरी आला व विनाकारण शिवीगाळ केली.त्यास बाहेर जाण्यासाठी सांगितले असता मला व माझ्या मुलाला शिवीगाळ केली व आरडाओरड करून घरातील सामान फेकाफेक करणे सुरू केले.मी व माझा मुलगा घराला कडी लावून दुसरीकडे बहिणीच्या घरातील साहित्याला निघून गेलो. माझा भाऊ मोतीसिंग खसावत याने त्याचे घरून ताटात विस्तव आणून घराची कडी उघडून घरात असलेल्या सामानाला आग लावली. यामध्ये बिछाना, वापरातील कपडे, भांडी, रेग्जीन बॅग, मुलाच्या खिशातील पैसे, शाळेची कागदपत्रे जळाली असून अंदाजे १५ ते २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. मंदा बटवाडे यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरूध्द भादंवि कलम ४३५, ४५१, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एएसआय लालसिंग चव्हाण करीत आहेत.