April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

बकऱ्या वाचवण्याच्या प्रयत्नात तीन जण गेले वाहून;तिघांचा मृत्यू तर एकाचा मृतदेह सापडला

खामगाव : तालुक्यातील माक्ता कोक्ता गावजवळील बोर्डि नदिमधे ३ जण वाहून गेल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार, गजानन लहानु रणसिंगे व राहुल गजानन रणसिंगे हे तिघे बकरी चारण्यासाठी गावाजवळ असलेल्या बोर्डी नदीजवळ गेले होते. त्यांच्यासोबत असलेल्या बकऱ्या चरत असताना पाण्यात पडल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दिलीप कळसकार यांचा पाय घसरला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले व त्यांना वाचवण्यासाठी गजानन रणसिंगे व राहुल रणसिंगे हे दोघे गेले असता त्यांना सुद्धा पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते दोघे सुद्धा वाहून गेले.घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी बोर्डि नदीकडे धाव घेतली,यावेळी गावातील लोकांना दिलीप कळसकार यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.त्यांनी तात्काळ मृतदेह बाहेर काढला व सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. गजानन रणसिंगे व राहुल रणसिंगे ह्या दोघांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळतात ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोहेका मनोहर कोल्हे व तहसील चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून गावकऱ्यांच्या मदतीने वाहून गेलेल्या दोघांचा शोध आपत्ति व्यवस्थापन कडून सुरू आहे.मृतक दिलीप नामदेव कळसकार यांना एक मुलगा व मुलगी असून ते शेती व्यवसाय करीत होते.

Related posts

कृषि केंद्राची तपासणी

nirbhid swarajya

शेगाव चे कोविड रुग्णालय निव्वळ देखावा: शेगांव संघर्ष समितिचा आरोप

nirbhid swarajya

रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची मीटिंग

nirbhid swarajya
error: Content is protected !!