खामगावातील इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून पालकाला धमकी
म्हणे कलेक्टर किंवा वर्षा गायकवाड कडे तक्रार कर
शाळेवर कारवाई होणार – शिक्षणाधिकारी
खामगांव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात ऑनलाईन शाळा सुरु झाल्या असल्या तरी बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीत पालकांना आपल्या पाल्यांच्या शाळांच्या फी भरणं अशक्य होत आहे. त्यातच काही शाळांनी आडमुठी भूमिका घेत फी न भरल्यास मुलांना शाळेतून काढून टाकण्याचे किंवा विद्यार्थ्यांना लागणारे कोणतेही कागदपत्रे न देण्याचे प्रकार घडले आहे. असाच एक प्रकरर बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात उघडकीस आला असून येथे तर मस्तवाल मुख्याध्यापकाने पालकाला जे होत असे ते करा वाटल्यास कलेक्टर किंवा वर्षा गायकवाड कडे तक्रार करा अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार पालकाने मोबाईल मध्ये कैद केले असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/watch/?v=454740195800627
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात असलेल्या एसएसडीव्ही या इंग्रजी शाळेतुन हा प्रकार समोर आलेला आहे. येथे आपल्या पाल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट घेण्यासाठी रेल्वे फोर्समध्ये कार्यरत असलेले जवान रंजन तेलंग हे गेले असता येथील मुख्याध्यापकाने त्यांच्यासोबत उद्धटपणाची वागणूक दिली पूर्ण फी आताच भरा तेव्हाच बोनाफाईड सर्टिफिकेट देईल अशी भूमिका मुख्याध्यापकाने घेतली. यानंतर सदर बालकाने आपल्या अर्जावर फीमुळे सर्टिफिकेट देत नाही असा शेरा लिहून द्या अशी मागणी केली असता सदर मुख्याध्यापकाने तुमच्या न जे होत असेल ते करून घ्या वाटल्यास कलेक्टर, वर्षा गायकवाड व पत्रकारांकडे जा अशी धमकी यावेळी दिली. Covid-19 मुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे या ऑनलाईन शिक्षणाची संपूर्ण फी शाळांकडून वसूल केल्या जात आहे. आपण मी भरणार नाही असे सांगितले नाही ती भरावाच लागेल मात्र त्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट न देणे हे योग्य नसल्याचे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत तक्रार करा अशी धमकी देणे चुकीचे असल्याचे पालक तेलंग यांनी सांगितले.