डोडा : जम्मू आणि काश्मिर मधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सागर दत्तात्रय डोईफोडे यांनी अतिशय दुर्गम डोंगराळ आणि अवघड प्रदेशात आपली जबाबदारी पार पाडली त्यांच्या या कामाची प्रधानमंत्री कार्यालयाने दखल घेऊन त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.
जम्मू काश्मीर चा डोडा जिल्हा हा अतिशय दुर्गम डोंगराळ आणि अवघड प्रदेश असून सुध्दा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सागर दत्तात्रय डोईफोडे त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, भद्रवाह कम्युनिटी हॉल, गुज्जर हॉस्टेल, डोडा कम्युनिटी हॉल मिळुन क्वारंटाईन साठी ३०० बेड फॅसिलिटी तयार करण्यात आली आहे अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयाचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरू दिली आहे.
तसेच डॉ. सागर डोईफोडे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी जनजागृती कार्यक्रम चालू केले आहेत. ते स्वतः पोस्टवर जाऊन बाहेरून येणाऱ्या लोकांच्या चेकिंगची पाहणी करत आहेत.
डॉ. सागर डोईफोडे हे मूळचे महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील निंबोडी गावचे आहेत.