आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे आज परत ३ रुग्णांनी कोरोना वर विजय मिळवला आहे, उपचार घेतल्या नंतर या ३ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, आता जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा कमी होऊन ९ झाला आहे. सुटी झालेल्यांमध्ये एक चिमुकला एक महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यामधील एकाच मृत्यू झाला होता तर २० रुग्णांवर जिल्हा स्त्री रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड मध्ये उपचार सुरू होते त्यापैकी १७ एप्रिल रोजी तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती, परत पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना देखील २० एप्रिल रोजी निरोप देण्यात आला होता तर आज देखील ३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना आज रुगणालयातून सुटी देण्यात आली. आज रोजी जिल्ह्यात ९ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह राहिले आहेत, सुटी देण्यात आलेले हे ३ रुग्ण दोन शेगाव मधील तर एक खामगाव तालुक्यातील चितोडा येथील आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. तर गेल्या आठवड्या पासून जिल्ह्यात एकही रुग्ण हा पॉझिटिव्ह आढळला नाही हे विशेष.