चिखली : पीक कर्जासाठी सर्व बँकांचे निकष एकच असायला हवे मात्र काही बँका यासाठी पॅन कार्ड मागतात तर काही बँका पॅन कार्ड न मागता पीक कर्ज देत आहे त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. केळवद तालुका चिखली येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापकाने पॅनकार्डची सक्ती केली आ)हे यामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाढली असून ही जाचक अट रद्द करण्याची मागणी होत आहे. कोरोनाच्या काळात पीककर्जासाठी कागदपत्रांची जमवाजमव करताना बळीराजाची दमछाक होत आहे. दुष्काळात तेरावा महिना याप्रमाणे बँकेत सातबारा, स्टॅम्प पेपर,फेरफार, नो ड्यूज, कागदपत्रानंतर पॅन कार्डची सक्ती करताना दिसून येत आहे. ही पॅन कार्डची जाचक शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरणार आहे. एकरी 18 हजार रुपये कर्ज बँक देत आहे. 50 हजाराचे आज करत असल्याने पॅन कार्ड नसले तरी चालते असे काही अधिकारी खासगीत सांगतात.तर काही ठिकाणी मात्र सक्ती केली जात आहे.
बळीराजाला फिरण्यासाठी 10 ते 15 दिवसाचा अवधी शिल्लक आहे तरी बँकांनी 18 टक्के पीक कर्ज वाटप आतापर्यंत पूर्ण केले आहे. 82 टक्के शेतकऱ्यांना अजूनही कागदपत्राची पुर्तता करताना नाकीनऊ येत आहे.मान्सूनची महाराष्ट्रात होणारे आगमन लक्षात घेता बळीराजाने पेरणीपूर्व मशागत करावी की पिक कर्जासाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता करण्यात वेळ घालवावा हा मोठा प्रश्न आहे तरी बँकांनी पॅन कार्ड रद्द करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.