खामगाव : येथून जवळ असलेल्या ग्रामपंचायत सुटाळा खुर्द मधील आरओ प्लांट धारकांनी अचानक आरओ च्या पाणी कॅनचे दर वाढवल्याने ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहे. मिळालेल्या महितीनुसार सुटाळा खुर्दचे सरपंच निलेश देशमुख यांनी गावातील साई एक्वा चे संचालक पांडूरंग नारायण बोचरे यांच्यासह सुटाळा खुर्द गावात सुरू असलेल्या आर प्लँट धारकांना एक पत्र वजा नोटीस दिली आहे. त्यांनी दिलेल्या पत्र वजा नोटीस मध्ये नमूद आहे की,सद्याच्या परिस्थितीत संपुर्ण देशासह जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाची महामारी सुरु आहे. अश्यातच तुमच्या आरओ प्लांट कडून अचानक कुठलीही पुर्व सुचना न देता पाणी कॅनचे दर हे वाढवलेआहे. तुमच्या आरओ प्लांट मधे पहिले ग्रामस्थाना १० रु कॅन देण्यात येत होते व घरपोच २० रु कॅन देण्यात येत होते. मात्र कुठलीही पुर्व सुचना न देता पाणी कॅनचे भाव वाढवल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थाना वेठीस धरले आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात लोकांना हे परवडणारे नसल्याने भाववाढ थांबवून ग्रामपंचायत मधील ग्रामस्थाना मदत करावी. अन्यथा आरओ प्लांटवर ग्रामपंचायत कडून कठोर कारवाई करावी लागेल. ग्रामपंचायतने दिलेल्या विनंती वजा कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या पत्रामुळे सुटाळा खुर्द मधील नागरिकांमधे चर्चा सुरु आहे. ग्रामपंचायतने दिलेल्या पत्रामुळे आरओ प्लांट संचालक भाव वाढ थांबवतात की ग्रामपंचायत कठोर कारवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र असे पत्र वजा नोटीस सरपंचांना देण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न काही आरो प्लँट धारक खाजगीत चर्चा करतांना दिसून येत आहे