बुलडाणा : आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घृणास्पद घटना जिल्हयातील पिंपळगाव सराई येथे घडली आहे. स्वतः च्या आईवर ४५ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या फरार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव सराई येथे हमाली करणाऱ्या भामट्याने आपल्या ६५ वर्षीय आईवरच अत्याचार केला. पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच घरी असल्याचा फायदा घेत या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले. रविवारी सकाळी आईने रायपूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. या घटनेची वार्ता गाव परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या अत्याचार करणाऱ्या मुलाला एक मुलगा व एक मुलगी असून मुलीचे लग्न सुद्धा झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दारुच्या नशेत पत्नीस व आईस मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी तत्काळ आरोपीला अटक करायला सांगितले होते. मात्र दुष्कर्म केल्या नंतर आरोपी फरार झाला आहे.
previous post