लाखनवाडा: लाखनवाडा येथे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 2 मे ला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य नवल रामदास पांढरे यांच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरवात भारतीय संविधानाच्या प्रस्तविकेचे वाचन करून झाली यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पंजाब डख पाटील यांनी भविष्यातील येणाऱ्या समस्या नको असतील व जमिनीची धूप थांबवून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर झाडे लावण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत लाखनवाडा च्या वतीने दिव्यांग बांधवांना रोख धनादेशाचे वितरण माझी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुधा करण्यात आला , यामधे कुमारी राज्यश्री रमेश चौधरी हिची (वाहतूक पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल) व कुणाल अनिल इंगळे याचा मेडिकल प्रवेश ( एमबीबीएस) निश्चित झाल्याबद्दल गुणगौरव करून सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले या कार्यक्रमाला लाखनवाडा परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच ग्राम पंचायत चे सर्व सदस्य व लाखनवाडा ग्राम तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाटे सर व कृष्णा चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम पांढरे सर यांनी केले या कार्यक्रमाला गावकऱ्यांची परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती