April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती भाजप कार्यालयात साजरी

खामगाव : भारतीय जनता पार्टीत द्वारे आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आ.अॅड.आकाश फुंडकर यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व पूजन करून अभिवादन केले. यावेळी मार्गदर्शन करताना आ.आकाश फुंडकर म्हणाले “पंडित दीनदयाळ उपाध्याय हे सच्चे राष्ट्रभक्त होते त्यांनी स्वतंत्र भारतात कश्मीर येथे भारतीय तिरंगा फडकवून “एक राष्ट्र एक ध्वज”ही संकल्पना सर्वांसमोर मांडली व आज ती प्रत्यक्षात देखील उतरलेली दिसून येते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कलम 370 व 35 हे हटवून एक राष्ट्र एक ध्वज हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्यायजी प्रमाणेच सर्वांनी राष्ट्रभक्ती जोपासावी असे आवाहन आ.आकाश फुंडकर यांनी केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया पश्चिम विदर्भ संयोजक सागर फुंडकर, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, राजेंद्र धनोकार, सतीश अप्पा दुडे,गणेश सोनोने, राकेश राणा, महेंद्र रोहनकार विलास देशमुख संजय भागदेवानी,उमेश चांडक माधवराव कांबळे,
जितेंद्र पुरोहित,लुंनकरणजी राठी शांताराम बोधे, कैलास डिक्कर,अनिता देशपांडे अशोक हट्टेल,पवन गरड,सुभाष इटणारे,समाधान मुंडे,रमेश इंगळे,अशोक मानकर,गजानन विभुते प्रसाद एदलाबादकर,यश आमले,संदीप शर्मा, विलास देशमुख,अमोल राठोड,सचिन पाठक,पवन राठोड,विकास चवरे,विष्णू काळे,आदित्य केडीया यांची उपस्थिती होती.

Related posts

अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा…!

nirbhid swarajya

वाढदिवशीच पालकमंत्री डॉ.शिगणेंनी कोरोनाबाबत घेतला आढावा

nirbhid swarajya

संग्रामपूर तालुक्यातील तामगाव ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता!शेत रस्ता झाला मोकळा

nirbhid swarajya
error: Content is protected !!