खामगांव : येथील नॅशनल शाळेजवळील रस्त्याच्या एका बाजूला एक मोठा खड्डा पडला आहे.त्यामुळे दररोज या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा खड्डा वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. त्या संदर्भात नगर पालिकेच्या बांधकाम विभागात अनेकदा तक्रार देण्यात आली होती, मात्र या तक्रारीकडे कोणी लक्ष दिले नाही. काही दिवसां पहिले बांधकाम विभागाने या खड्ड्याची थातूरमातूर डागडुगजी करून बुजवण्यात आला होता.मात्र गेल्या काही दिवसांपुर्वी पडलेल्या पावसामुळे खड्ड्या अजुन जैसे थे परिस्थितीत झाला आहे.
अपघाताला आमंत्रण देणारा हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा अशी मागणी वाहनचालक करीत आहे. नॅशनल शाळेजवळील या खड्ड्या जवळ शहरातील बँक, शाळा तसेच महावितरण कंपनीचे कार्यालय असून या रस्त्याने वाहनांची गर्दी जास्त प्रमाणात असते या रस्त्यावर अनेकदा वाहनधारकांना खड्डे दिसत नाही, अचानक खड्डा समोर दिसतो व वाहनधारक गोंधळून जातात त्यामुळे वाहन बाजूला घेत असताना नियंत्रण सुटून अपघात सुद्धा घडत आहे. नगर परिषदेने याची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्यात यावा अशी मागणी वाहनधारक करताना दिसत आहे.