खामगांव : आज ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त निर्भिड स्वराज्य व स्वराज्य फाऊंडेशन तर्फे सामान्य रुग्णालय खामगाव येथे कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी सामन्य रुग्णालयाच्या रक्त पेढी मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या काळातही रुग्णालयातील रक्तपेढी मद्ये मुबलक प्रमाणात रक्ताचा साठा असल्याने या रक्तदान शिबिरामध्ये डॉक्टरांच्या सांगण्यावरून १० जणांनी रक्तदान केले. यामध्येन अमोल गावंडे,शुभम खुमकर,राहुल गवई,आकाश चोपडे,योगेश शेगोकार,कृष्णा जवंजाळ,निखिल शाह,नितीन सुर्वे,शिवाजी भोसले,कुणाल देशपांडे, यांनी रक्तदान केले.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे व रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी व स्वराज्य फाउंडेशन साक्षी पाटील ,तेजल पाटील,अविनाश कुटे,आकाश खरपाडे यांची उपस्थित होती.