January 4, 2025
अमरावती आरोग्य गुन्हेगारी जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई राजकीय शिक्षण

नांदुऱ्यामधे शिक्षणाच्या आईचा घो….

फी भरली नसल्याने शाळेने ठेवले निकाल रोखून….

नांदुरा : येथील श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरली नसल्याने शाळेकडून त्यांचा निकाल रोखण्यात आल्याची तक्रार काही पालकांनी केली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र शासनाने पालकांकडून जबरदस्तीने फी न घेण्याचे आवाहन केले होते तसे आदेश सुद्धा राज्य सरकारने शिक्षण विभागाकडून काढले होते. मात्र नांदुरा येथील झांबड विद्यानिकेतन शाळेतील ब-याच पालकांनी शाळेची फी भरली नसल्याने त्यांच्या पाल्यांचे निकाल रोखून धरल्याची घटना नांदुरा येथे घडली आहे. कोरोनामुळे नांदुरा मधील बऱ्याच शाळांनी पालकानी निर्णय घेऊन ३० टक्‍क्‍यांपर्यंत फी कमी केली आहे.शासनाने देखील विविध परिपत्रके काढून आदेश दिले होते. व पालकांना याबाबत दिलासा देण्याचे कळवले यावर शिक्षणाधिकारी बुलढाणा यांनी देखील सर्व शाळांना केवळ परीक्षा फी व ट्यूशन फी घेऊन इतर अतिरिक्त फी जसे की लायब्ररी, कम्प्युटर,ऍक्टिव्हिटी,मेंटेनन्स, वगैरे फी कमी करण्याबाबत कळवले होते. मात्र शाळांनी शासनाच्या या परिपत्रकाला केराची टोपली दाखवल्याचे प्रकार दिसून येतो आहे. फी भरली नसल्याने निकाल रोखून धरले असल्याने पालक संतप्त झाले आहे. याकरिता त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व पालक केवळ परीक्षा फी व ट्यूशन फी घेऊन अतिरिक्त फी भरणार नाही. शाळेने अनावश्यक फी मध्ये कपात करून पालकांना थोडासा दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. यापूर्वी देखील बऱ्याच वेळा पालकानी सभा घेऊन चर्चा करून काहीतरी फी कमी करण्याबाबत सांगितले होते. मात्र शाळेकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही. यावर्षी पालकांना ऑनलाइन क्लासेस साठी मोबाईल रिचार्ज, हेडफोन, स्पीकर, कॉम्प्युटर, लॅपटॉप इतर बरेच खर्च करावे लागले त्यामुळे अनेक पालकांच्या आर्थिक बजेट कोलमडले आहे. शाळेला सुद्धा विनंती केली परंतु त्यावर कोणतीही कारवाई न करता शाळेने सांगितले की तुम्हाला सर्वच फी भरावी लागणार आहे व आम्हाला हे नियम लागू नाही अशी ताठर भूमिका घेतली आहे. याकरिता पालकांनी शाळेत विनंती अर्ज देण्याचा प्रयत्न केला असता शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अर्ज घेण्यास व पोच देण्यास नकार देऊन अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. केवळ फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना यावर्षी निकाला पासून व पुढील प्रवेशापासून वंचित ठेवत आहेत ही खूप मोठी गंभीर बाब आहे. आमच्या या अर्जाचे विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाल्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान शैक्षणिक नुकसान टाळावे असे सुद्धा पालकांनी दिलेल्या अर्जात सांगितले आहे या शाळेतून सुरुवातीपासूनच त्यांच्या मर्जीतील दुकानदाराची संगणमत करून शालेय पुस्तके, वह्या व गणवेश इत्यादी साहित्य ला विक्री करून लाखो रुपयांचा अपहार केला आहे. शाळेत फि बाकी असणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक देऊन भेदभाव केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चिकरण करुन फिबाबत दबावतंत्राचा वापर शाळेकडुन वारंवार केल्या जात असतो. तसेच फी भरण्यास विलंब झाल्यास पालकांकडून दोन रुपये प्रति दिवस याप्रमाणे वसुली सुद्धा करण्यात येते. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन व इतर स्पर्धा च्या नावाखाली पालकांकडून अव्वाच्यासव्वा वसुली केली जाते. कोणत्याही निर्णयात पालकांना विश्वासात घेतले जात नाही, त्याचा हिशोब सादर केला जात नाही,शाळेत तक्रार रजिस्टर ठेवलेले नाही, कोणत्याही अर्जाची पोच दिल्या जात नाही मुख्याध्यापिका केवल पालकांचे केवळ तोंडी म्हणणे ऐकून घेतात मात्र त्यावर कोणतीच कारवाई करत नाही अशा प्रकारचे विविध आरोप पालकांनी झांबड विद्यानिकेतन नांदुरा वर केले आहे. ज्या पालकांनी फी भरली नाही त्यांच्या पाल्यांना ऑनलाइन क्लासेस पासून सुद्धा वंचित ठेवण्यात येत आहे असे काही पालकांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना सांगितले आहे. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या पाल्यांचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालकांनी केली आहे.

Related posts

(Home quarantine)गृह विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

nirbhid swarajya

“त्या” कोरोना संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह,कोरोनामुळे मुत्यु झाला नाही…

nirbhid swarajya

डॉ. आशिष अग्रवाल यांनी केली कंपाउंडर ला मारहाण; गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!