नवी येरळी जवळ झाला अपघात…
दोन दू चाकींचा समोरा समोर झाला अपघात...
नांदुरा : 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जळगाव जामोद महामार्गावर नवी येरळी जवळ गजानन महाराज मंदिराच्या अलीकडे दोन दू चाकींचा समोरा समोर अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार एका दूचाकीवर एक महिला आणि एक लहान बाळ तर दुसऱ्या दूचाकीवर दोन तरूण असे एकंदरीत पाच लोक या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.अपघात होताच मोठ्या प्रमाणावर लोकांचा जमाव तिथे झाला.तर काही लोकांनी स्वयंस्फूर्तीने समोर येवून रोडने जाणाऱ्या चारचाकी गाडींना थांबवले.यावेळी पोलीस बांधवांनी सुद्धा सामाजिक दायीत्व दाखवत त्या अपघात ग्रस्थांना पोहचवण्यासाठी मदत केली.त्या पाचही जखमींना रुग्णालयामध्ये घेवून गेले असून त्यांचे गाव आणि नाव अद्याप समजू शकले नाही.