खामगांव : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याला कुठेतरी निर्बंध लागावे याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यू लावला आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून या जनता कर्फ्यु साठी काही नियम सुद्धा लावले आहेत.मात्र खामगाव नगर परिषदचे कर्मचारी विना मास्क दुचाकिवर शहरात फिरतांना खामगाव शहर पोलीस स्टेशन जवळ नगरपरिषदेच्या पथकाला आढळून आले.
त्या वेळेस नगरपालिकेच्ये पथक त्या विना मास्क असलेल्या न.प.कर्मचाऱ्याला विना मास्क असल्याप्रकरणी कारवाई न करताच सोडत होते परंतु तेथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराच्या सदर प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्या न.प.पथकाला त्या न.प.कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यास भाग पाडले. रितेश तिवारी या विना मास्क असलेल्या न.प. कर्मचाऱ्याला न.प. कर्मचाऱ्यांनीच पाचशे रुपयांचा दंड दिला. ह्या सर्व प्रकारावरून पुन्हा एकदा खामगाव नगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड्यावर आला हे विशेष..या कार्यवाहीची दिवसभर खामगाव शहरात एकच चर्चा सुरु आहे.