खामगाव: नगरपरिषद इमारतीत बसविण्यात आलेले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट धूळखात असल्याचे चित्र असल्याचा प्रसार होतांना दिसून येत आहे. आपल्या नगरपरिषद मध्ये अशा प्रकारची सुद्धा सुविधा देण्यात येते या अशा प्रकारच्या सुविधांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.मात्र नगरपरिषद प्रशासन व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.जेव्हापासून हे चार्जिंग पॉइंट लावले आहेत तेव्हापासून अद्याप पर्यंत आपण किती गाड्यांची चार्जिंग केलेली आहे? असा प्रश्नच निर्माण होत आहे.एक तर केंद्र सरकारने उपक्रम हाती घेतला आहे. त्या उपक्रमास जर अधिकारी वर्गच प्रोत्साहन देत नसेल तर नागरिक याकडे कसे आकर्षित होतील.वायू प्रदूषण कमी होण्याच्या हेतूने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे ही योजना पूर्वतास नेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत त्यालाच अनुसरून नगरपरिषद प्रशासन काम करताना दिसून येत नाही.एकीकडे नगरपरिषद वायू प्रदूषणाबाबत सुद्धा गंभीर होतांना दिसून येत नाहीये.