October 5, 2025
अकोला आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शेगांव

देहव्यापार करताना दोघांना अटक ; गुन्हा दाखल

शेगांव : काल २४ एप्रिल शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शेगांव शहर पोलिसांनी बाळापूर रोडवरील अंबर लॉजवर छापा टाकला असता दोन जण देहविक्री करताना आढळले. यामध्ये अंबर लॉजिंग व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे वय २३ वर्षे रा. म्हाडा कॉलनी शेगाव व ग्राहक कुलदीप शिवाजी भाकरे वय ३० वर्ष रा.मोरगाव भाकरे जि. अकोला या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेगांव शहरातील बाळापूर रोडवर असलेल्या अंबर लॉजमध्ये बेकायदेशीर देहविक्री चालू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना गुप्त बातमी दाराकडून मिळाल्या नुसार शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश कुमार धंदे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजर असताना अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत खामगाव यांच्या पथकातील महिला अंमलदार व अधिकारी पीएसआय बोरसे हे आनंद सागर रोडवर उभे असून त्यांना अंबर लॉजवर देहविक्री चालू असल्याची खात्रीलायक बातमी बातमीदाराकडुन मिळाली व ते ग्राहक म्हणून आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संतोष टाले यांना माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या सोबत महिला अंमलदार व पोलीस स्टाफ यांनी आनंद-सागर समोरील हॉटेल अंबर लॉजवर छापा मारून कारवाई केली असता त्यामधे एक महिला व अंबर हॉटेल व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे आणि ग्राहक कुलदीप शिवाजी भाकरे असे दोन जण देहव्यापार करतांना मिळून आले. यावेळी आरोपीं जवळून नगदी ४ हजार ४०० रुपये एक कंडोम पाकिट किंमत २० रु आणि अनवॉंन्टेड गोळ्यांचे पाकिट ज्यामध्ये १७ गोळ्या किंमत ६० रुपये असा एकूण ४ हजार ४८० रपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनैतिक व्यापार करताना मिळून आल्यावरून शेगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध कलम ३,४,५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले आहेत.

Related posts

खामगांवमधे लव्ह जिहाद प्रकरण उघड़किस;खोटी ओळख सांगून केले लग्न

nirbhid swarajya

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु

nirbhid swarajya

राम मिश्रा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!