April 19, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शिक्षण शेगांव सामाजिक

देश कोरोनामुक्त होण्यासाठी चिमुकलीने ठेवले पवित्र रमजान महिन्याचे सर्व रोजे

देश या कोरोना संकटातून बाहेर पडावे अशी अल्लाहकडे विशेष प्रार्थना

शेगांव: सध्या देश व जग कोरोना संसर्गाच्या संकटात आहे. अशा परिस्थितीत कडक उन्हात पवित्र रमजान महीना सुरु आहे. कोरोना महामारीने जगातील जनता त्रस्त झाली आहे. जग व भारत देश कोरोनामुक्त व्हावे अशी प्रार्थना इश्वराकडे करत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील आझाद नगर येथील ९ वर्षाच्या अबीरा देशमुख या चिमुकलीने रमजान महीन्याचे सर्व उपवास (रोजे) ठेवले असून या कडक उपवासात देशात व जगात पहील्यासारखे जनजीवन निर्माण व्हावे. कोरोनाबाधितांची प्रकृती बरी व्हावी. देश या कोरोना संकटातून बाहेर पडावे अशी विशेष प्रार्थना अल्लाहकडे दररोज रोजा इफ्तार करतांना कुटुंबियांसोबत केली. शेगाव येथील सेंट झेवियर्स इंग्लिश स्कुल मध्ये इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अबीरा फहीम देशमुख हिने सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ४.४५ वाजेपासून ते सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत रोजाच्या नियमांनुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह (ईश्वर) प्रति श्रद्धा व्यक्त केली. अबीरा हिने ठेवलेले महिन्याभराच्या रोजे थक्क करणारे ठरले आहे. भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून अबीरा हि चिमुकली साश्रुनयनांनी दररोज साकडे घालते. आई वडिलांनी हिंमत दिली. उन्हात बाहेर निघत नाही. मोठे होवून डॉक्टर बणण्याची इच्छा आहे. देशात व जगात पहील्यासारखे जनजीवन निर्माण व्हावे. कोरोनाबाधितांची प्रकृती बरी व्हावी. देश या कोरोना संकटातून बाहेर पडावे अशी विशेष प्रार्थना अल्लाहकडे दररोज रोजा इफ्तार करतांना कुटुंबासोबत अबीरा आवर्जून करते.

Related posts

बुलडाण्यात महिला पोलिस कर्मचारीचे प्रायव्हेट फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

nirbhid swarajya

इलेक्ट्रिक शॉक लागून एकाचा मृत्यू ; एक जण जखमी

nirbhid swarajya

मराठा सेवा संघाचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहात

nirbhid swarajya
error: Content is protected !!