खामगांव : स्थानिक दिव्यांग पंख फाउंडेशन यांच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग महिला व बांधवांना विविध रोजगार उपलब्ध होण्याकरिता संस्थेने पुढाकार घेतला आहे.सविस्तर वृत्त असे की,निर्भिड स्वराज्यने पंख फाऊंडेशन’च्या मिलिंद मधुपवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की शहरातील दिव्यांग महिला व पुरुषांना दुकाने लावून देऊन रोजगार मिळवून देण्याचे काम पंख फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.येथील पंख फाउंडेशनच्या वतीने दिव्यांगाना विविध रोजगार उपलब्ध करून देण्यात येतात.अनेक दिव्यांगांना यामुळे रोजगार मिळाले आहेत. कोरोना काळात वाहने सॅनीटाईज करण्याचा व्यवसाय तसेच दिवाळी निमित्त फराळ तयार करणे व विकण्याचा व्यवसाय सुद्धा पंख फाऊंडेशनने दिव्यांगांना दिला आहे.शहरातील दिपाली रौंदळे व विनायक बोधनकार यांना भुसावळ चौकात शैक्षणिक साहित्याचे दुकान लावून देण्यात आले आहे. या दुकानात सुरुवातीला लागणारे भांडवल पंख फाउंडेशनच्या वतीने दिली आहे.तसेच जिल्हाभरातील दिव्यांग महिलांना शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण सुद्धा पंख फाऊंडेशन तर्फे देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण दिल्यानंतर महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन ही संस्था शिलाई साठी कपडे देणार आहे व त्यानंतर शिलाई केले वस्त्र विकतही घेणार आहे.त्यामुळे दिव्यांग महिलांना रोजगार मिळणार आहे. सुरुवातीला दहा महिलांना प्रशिक्षण व रोजगार देण्यात येईल. तरी लवकरात लवकर जिल्ह्यातील दिव्यांग महिलांनी पंख फाउंडेशन ची संपर्क साधून प्रशिक्षण घेण्याचे आवाहन असे पंख फाऊंडेशनच्या नैना मधुपवार सपना नेमाडे यांनी केले आहे.
previous post