बुलडाणा : देशभरात कोविड विषाणूच्या थैमानामुळे अनेक शाळा बंद आहे. त्यामुळे कला संचालनालया तर्फे शैक्षणिक वर्षात घेतल्या जाणाऱ्या परिक्षा झाल्या नाहीत. यावर्षी जे विद्यार्थी माध्यमिक शालांत परिक्षेमध्ये प्रविष्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना वाढीव सवलतीच्या गुणांपासून वंचित राहू नये याकरीता शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या चित्रकला विषयातील सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागणार आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला असून शासन निर्णय रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी 30 मार्च रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करुन कोविडच्या प्रादुभार्वामुळे विद्यार्थ्यांच्या हितार्थ शासकीय रेखाकला परिक्षा आयोजित न करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्याच बरोरर शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षा देणाछया विद्याथ्यार्ला शासकीय रेखा कला परिक्षेचे सवलतीचे गुण देण्यात येवू नये असे निर्देश दिले असल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी सवलतीचे वाढीव गुणांपासून वंचित राहणार आहे. करीता विदर्भ कला शिक्षक संघ जिल्हा बुलडाणा यांच्याकडून बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये महेंद्र कोकणे, सुनिल मोरुड, जहिर महंमद, प्रशांत राठोड, अनिल गवई, सुभाष देशमुख, गणेश ताले, गणेश अंभोरे, संजय रातोळे, राम तिडके, संजय काकडे, यशवंत खाकरे, शिवशंकर करवंदे, शंकर बुरकूल सर्व सदस्य हजर होते.