खामगांव : स्थानिक सुप्रसिध्द अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल हे ‘अग्रवाल हॉस्पिटल’, नांदुरा रोड, खामगाव येथे मागील दिड़ वर्षा पासुन सेवा देत आहेत. कमी वेळेतच त्यांनी फ्रॅक्चर ट्रीटमेंट सोबतच गुड़घा बदली व दुर्बिणिद्वारे शस्त्रक्रिया तसेच अनेक मोठ्या जटिल शस्त्रक्रिया करून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. डॉ. नितीश हे ऑस्ट्रेलिया येथून अस्थिविकारावर अत्याधुनीक तंत्रज्ञानाने उपचार करण्याची पध्दती शिकून आलेले आहेत. तसेच नाशिक व मुंबई येथील नामांकीत हॉस्पिटल्स मध्ये १ हजाराच्या वर गुडघाबदली व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे अनुभव त्यांनी घेतलेले आहे.
आता अकोला येथिल विदर्भात अग्रगण्य असलेल्या आयकॉन होस्पिटल येथे ते दर शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत ओपीडी मध्ये उपलब्ध राहुन अस्थिरुग्णांची तपासणी करतील. तसेच ईतर दिवशीही गुड़घाबदली व दुर्बिणिद्वारे शस्त्रक्रिया व तत्सम मोठ्या शस्त्रक्रिये साठीही ते वेळेनुसार उपलब्ध राहणार आहेत. अस्थिरुग्णांना उपचारासाठी मेट्रोसिटीज़ मध्ये जाण्याचा त्रास होऊ नये आणि रुग्णसेवा घडावी या उद्देशाने सेवा देण्याचा मानस यावेळी डॉ. नितीश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.