इयत्ता 1 ते 8 पर्यंत DD सहयाद्री वर खास मार्गदर्शन
खामगाव:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेतून आणि दूरसंचार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनि शासकीय चॅनेल DD सहयाद्री यावर मराठी भाषेत सोपं अस डिजिटल शिक्षण इयत्ता 1 ली ते 8 वि पर्यंत विध्यार्थी साठी सुरू केलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने देशभरात लोकडाऊन ची स्तिथी असल्याने परिणामी शाळा बंद आहेत. अश्या परिस्थिती मध्ये विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. दूरदर्शन च्या देशातील सर्व प्रादेशिक वाहिनीवर 20 जुलै ते 26 सप्टेंबर या कालावधीत” टिली मिली आनंददायी शिक्षण” हा अभिनव शिक्षण उपक्रम सुरू केला आहे. इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्ध्याना आधुनिक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात डीडी संह्यांद्री या प्रादेशिक चॅनेल वर सोमवार ते शनिवार या दिवसात इयत्ता 1 ते 8 पर्यंत केवळ अर्धा तास डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये डीडी संह्यांद्री या मराठी प्रादेशिक चॅनेल वर इयत्ता 8 वी सकाळी 7.30 , इयता 7 वी सकाळी 8 वा. , इयत्ता 6 वी सकाळी 9 वा, इयत्ता 5 वी सकाळी 9.30 वा. , इयत्ता 4 थी सकाळी 10 वा. , इयत्ता 3 री सकाळी 10.30 , इयत्ता 2 री 11.30 वा., आणि इयत्ता 1 ली दुपारी 12 वाजता अश्या प्रकारे विद्यार्त्याना डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे . तरी गरीब जनता जे अँड्रॉइड मोबाईल घेऊ शकत नाही त्यामुळे या कार्यक्रमाद्वारे गरीब विध्यार्थी व पालकांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार ने हा सरळ आणि सोपा कार्यक्रम सुरू केला आहे. आपन आपल्या मुलांसाठी या कार्यक्रमाचा घ्यावा आणि आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करावे , तसेच त्या गरीब लोकांकडे मोबाइल किंवा टीव्ही नाही अश्या लोकांच्या मदतीसाठी गावातील भाजप पदाधिकारी ,कार्यकर्ते , दानसुर ,सामाजिक कार्यकर्ते, यांनी मदत करावी व आपल्या घरी किंवा मोकळ्या जागेत गरीब विध्यार्थ्यांसाठी मदत करावी असे आवाहन भाजप बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांनी केले आहे .