युवा सरपंच ज्ञानेश्वर महाले यांची प्रमुख उपस्थिती…
ज्ञानगंगापूर: ज्ञानगंगापूर येथील अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच ज्ञानेश्वर महाले उपस्थीत होते तसेच अंगणवाडी सेविका नलिनी महाले यांनी गरोदर असणाऱ्या महिलांना तसेच लहान बाळांना कुपोषण पासून कसे दूर करायचे या विषयावर मार्गदर्शन केले.सप्टेंबर महिन्यात १ ते ३० सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण महा अभियान म्हणून साजरा करण्यात येत आहे.अंगणवाडी सेविका या शासनाच्या विविध होत असलेल्या कामात एक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी ज्ञानगंगापूर सरपंच ज्ञानेश्वर महाले सांगितले.शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान असल्याचे यावेळी सरपंच यांनी सांगितले.नलिनी महाले संचालन अंगणवाडी सेविका तर,आभार मानले. यावेळी गावातील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,लहान मुले,गावातील गरोदर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.