संग्रामपूर प्रतिनिधी :- तालुक्यात मागील 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. रस्त्यावरून वाहणारे पाणी जिल्हा परिषद शाळेत शिरले आहे. त्यामुळे शाळेतील परिसर तलावसदृश्य चित्र निर्माण झाले आहे.संग्रामपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात सततधार पाऊस झाल्याने अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयाचे आवारात तसेच अनेक शाळांच्या आवारातही पाणीच पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.यातच निवाणा येथील जि.प.केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात पाणीच पाणी साचल्याने पाण्याचा तलावसदृश्य दिसत आहे.ह्यामुळे शाळेत येणाऱ्या चिमुकल्याना कसरत करावी लावत आहे. संग्रामपूर तालुक्यात गेल्या दोन दिवस रात्रंदिवस सततधार पाऊस सुरु राहिल्याने निवाणा येथील जि.प.केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात पाणीच पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे.आज दि,१९ रोजी मंगळवारी लहान मुले मुली शाळेत आले असता त्याःना ह्या साचलेल्या पाण्यातून जातांना मोठी कसरत करावी लागली आहे.तसेच हे पाणी साचून राहिले तर लहान मुलांचे आरोग्याचे दृष्टीने घातक आहे तरी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्यापक,शिक्षक आणि वरीष्ठ अधिका-यांनी दखल घेवून ह्या साचलेल्या पाण्याची त्वरीत विल्हेवाट लावावी.अशी पालकांची मागणी आहे.ह्या शाळेच्या दुरावस्थेबाबत पालकांनी संताप व्यक्त केला.
“सततधार पाऊस सुरू असल्याने शाळेच्या आवारात भरपूर पाणी साचले आहे हे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही .शाळेला कोणती ग्रँड उपलब्ध नाही, याबाबत ग्रा.प.ने व्यवस्था करून पेव्हर ब्लॉक बसवण्यात यावे असे पत्रव्यवहार केलेले आहे.”
श्रीकृष्ण इघोकार
प्रभारी मुख्याध्यापक,निवाना
शाळेच्या आवारात पाणी साचले असून तलाव झाले आहे ,यामुळे आमच्या मुलांना त्रास होत आहे व आरोग्य च्या दृष्टीने आजार होण्याची शक्यता आहे, या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्यात यावे .
विलास धामोळे,
पालक, निवाना