अधिकाऱ्यासह बहुतांश कर्मचारी गैरहजर कार्यवाही होणार का?
शेगांव: तालुक्याती जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी आज दुपारच्या सुमारास अचानकपणे भेट दिली असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यासह बहुतांश कर्मचारी गैरहजर आढळून आले आहे. केवळ चारच कर्मचारी हजर होते. त्यामुळे गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होनार याकडे जलंब ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांच्या सोयी सुविधेसाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दवाखान्यामध्ये नियमितपणे उपस्थित असणे आवश्यक आहे.परंतु जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे दुपारी येथून निघून जातात. त्यामुळे दुपारनंतर आलेल्या रुग्णांना उपचाराविना येथून परत जावे लागते. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी अचानक पणे दुपारी भेट दिली असता जलंब प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फक्त काहीच कर्मचारी हजर होते तर वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर आढळून आले.त्यामुळे आता गैरहजर कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते. याकडे जलंब ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांच्यासोबत सरपंच सौ. दुर्गाताई गव्हांदे, समाज सेवक उत्तम घोपे,राजेंद्र देशमुख आदी जलंब ग्रामस्थ उपस्थित होते.