बुलडाणा : निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले असले तरी बुलडाणा जिल्ह्यात या चक्रीवादळाचा फारसा परिणाम जाणवला नसून 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा आणि पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज तीन जून रोजी 7.2 मिलिमीटर पाऊस झाला असून त्याची एकूण टक्केवारी 0.94 एवढी आहे. मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, तालुक्यात पाऊस बरसला तर काही ग्रामीण भागात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा सुटला तर पावसाने हजेरी लावली तसेच बुलडाण्यात 0.80% चिखली 1.51% देऊळगाव राजा 1.79% सिंदखेड राजा 3.45% लोणार 1.60 % मेहकर 1.51% खामगाव 0.38 % शेगाव 0.03% मलकापूर 0.00 % नांदुरा 0.04% मोताळा 0.20 % संग्रामपूर 0.10% जळगाव जामोद 0.20% असा एकूण तेरा तालुक्यात 0.94 टक्के पाऊस पडल्याची शासकीय नोंद आहे.
previous post