बुलडाणा : जिल्ह्यात एकूण 21 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे. उर्वरित 20 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी तीन रूग्णांचे नमुने निगेटीव्ह आले असून त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित 17 रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तसेच आज 17 एप्रिल रोजी 19 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 19 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 21 आहेत आणि कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 17 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
सौजन्य : जि.मा.का