January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 397 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 138 पॉझिटिव्ह

98 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 535 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 397 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 138 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 108 व रॅपिड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 229 तर रॅपिड टेस्टमधील 168 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 397 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 2, खामगांव शहर : 19, खामगांव तालुका : घाटपुरी 1, लाखनवाडा 1, पिं. राजा 3, शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : टाकळी विरो 1, संग्रामपूर तालुका : धामण गोट 1, संग्रामपूर शहर : 4, दे.राजा शहर : 9, दे. राजा तालुका : गोंधनखेड 1, अंढेरा 1, दे. मही 5, बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 2, हिवरा 2, मोताळा शहर : 6, मोताळा तालुका : धा. बढे 1, शेलापूर 1, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 1, जळगांव जामोद शहर : 7, मेहकर तालुका : मादनी 3, पिंप्री माळी 5, उकळी 1, शेलगांव दे. 6, डोणगांव 7, हिवरा आश्रम 2, मेहकर शहर : 3, नांदुरा शहर : 3, लोणार शहर : 1, लोणार तालुका : सावरगांव तेली 1, चिंचोली 2, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, दे. धनगर 1, चिखली शहर : 9, चिखली तालुका : आंधई चांधई 1, खंडाळा 3, सवणा 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 138 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान समता कॉलनी, खामगांव येथील 68 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरूष व शिवाजी वेस, खामगांव येथील 83 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 198 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार बरे होवून सोडलेले रूग्ण खामगांव : 20, जळगांव जामोद : 18, सिं. राजा : 14, मेहकर : 11, शेगांव : 14, मलकापूर : 29, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 22, चिखली : 10, नांदुरा : 15, दे. राजा : 19, लोणार : 12, मोताळा : 1, सग्रामपूर 13.
तसेच आजपर्यंत 24494 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4231 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4231 आहे.
आज रोजी 1497 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 24494 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5392 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4231 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1092 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 69 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात प्राप्त 302 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 64 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

चौधरी वाईन शॉपमधून गैर कायदेशीर दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा छापा

nirbhid swarajya

खामगावात जनता कर्फ्यू १०० % यशस्वी.. आ.आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद

nirbhid swarajya
error: Content is protected !!