April 19, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 241 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 55 पॉझिटिव्ह

19 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 296 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 241 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 49 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 173 तर रॅपिड टेस्टमधील 68 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 241 अहवाल निगेटीव्ह आहेत.पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : ब्रम्हपुरी ता. चिखली : 60 वर्षीय पुरूष, दाताळा ता. मलकापूर : 52 वर्षीय महिला, बुलडाणा : तेलगु नगर 78 वर्षीय पुरूष, डोंगरशेवली ता. चिखली : 48 वर्षीय महिला, दे. राजा : 42, 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 60 व 28 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरूष, नांदुरा : 18 वर्षीय तरूणी, 60, 65 वर्षीय पुरूष, कृष्णा नगर 72 वर्षीय पुरूष, मारवाडी गल्ली 25 वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द 85,20 वर्षीय पुरूष, 22 वर्षीय महिला, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 39 वर्षीय पुरूष, वडनेर ता. नांदुरा : 78 वर्षीय पुरूष, बेलाड ता. नांदुरा: 22 वर्षीय महिला, सुलतानूपर ता. लोणार : 35, 27, 25, 55 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, अंचरवाडी ता. चिखली : 52, 5 वर्षीय पुरूष, चिखली : 33 वर्षीय महिला, पिं.राजा ता. खामगांव : 52, 26, 8, 31, 35 वर्षीय पुरूष, 72, 30, 31 वर्षीय महिला, शेगांव : 70, 33, 42, 31, 30 वर्षीय पुरूष, 35, 27, 29, 45 वर्षीय महिला, सिंदखेड राजा : 32 वर्षीय पुरूष, आडगांव राजा ता. सिं.राजा : 21, 68 वर्षीय पुरूष, शेंदुर्जन ता. सिं.राजा : 51 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला,खामगांव : भुसावळ चौक 52 व 30 वर्षीय महिला, जुना धान्य बाजार 70 वर्षीय पुरूष, समन्वय नगर 53 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे.त्याचप्रमाणे आज उपचारादरम्यान खामगांव येथील 52 वर्षीय पुरूष व दे. राजा येथील 65 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 19 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मलकापूर : पोलीस चौकी 36 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरूष, नांदुरा : नांदुरा खुर्द 20 वर्षीय महिला, 17 वर्षीय पुरूष, शेगाव : दसरा नगर 61 वर्षीय पुरूष, पिं. राजा ता. खामगांव : 36, 38, 23, 55 वर्षीय पुरूष, चिखली : पोलीस स्टेशनजवळ 43 वर्षीय महिला, शिवाजी नगर 69 वर्षीय पुरूष, दे. राजा : 38 व 40 वर्षीय पुरूष, दुर्गानगर 60 वर्षीय महिला, जुना जालना रोड 40 वर्षीय महिला, दुर्गापूरा 64 वर्षीय महिला, आंबेडकर नगर 59 वर्षीय पुरूष, आदर्श कॉलनी 28 वर्षीय पुरूष, अहिंसा मार्ग 67 वर्षीय महिला. तसेच आजपर्यंत 7465 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 662 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 662 आहे.
आज रोजी 114 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7465 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1060 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 662 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 371 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 27 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

आदिवासी भागात डॉक्टर कमी पत्रकारिता करणाऱ्या एका सुपरीबाज पत्रकारांचा सुळसुळाट

nirbhid swarajya

वंचित कडून सतीश पवार विरुद्ध पोलिसात तक्रार…

nirbhid swarajya

अखेर अग्रवाल फटाखा केंद्राचा परवाना रद्द

nirbhid swarajya
error: Content is protected !!