April 18, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 212 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 38 पॉझिटिव्ह

2 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 250 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 212 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 38 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 29 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 82 तर रॅपिड टेस्टमधील 130 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 212 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा : 1, भावसार देवी मंदीराजवळ 1, शिवाजी नगर 2, दे. राजा : माळीपुरा 1, कोलारा ता. चिखली : 2, चिखली : 4, सोनेवाडी ता. चिखली : 1, बुलडाणा : सोळंके ले आऊट 1, विष्णूवाडी 1, चैतन्यवाडी 1, पिंपळगांव सराई ता. बुलडाणा : 1, धाड ता. बुलडाणा : 2, मलकापूर : 3, सुलतानूपर ता. लोणार : 1, तपोवन ता. मोताळा : 1, भालेगांव ता. मलकापूर : 3, झोडगा वसर ता. खामगांव : 1, खामगांव : जुना फैल 3, अनिकेत रोड 3, घाटपुरी नाका 1, गोपाल नगर 1, खती ले आऊट 1,शेगांव: धनोकार नगर 1, सुरभी कॉलनी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 38 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे नांदुरा येथील 50 वर्षीय पुरूष व चैतन्यवाडी, बुलडाणा येथील एका 77 वर्षीय पुरूष रूग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे.
तसेच आज 2 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 2.
तसेच आजपर्यंत 13225 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1234 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1234 आहे.
आज रोजी 126 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 13225 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2067 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1234 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 795 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 38 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

खामगाव सिलिंडरच्या ट्रकला धडक दिल्याने भरवस्तीत गॅस गळती…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 294 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

डॉक्टराने दिला विठ्ठलाला प्रसाद..

nirbhid swarajya
error: Content is protected !!