April 19, 2025
आरोग्य बुलडाणा

जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांवर यंत्रणेचे विशेष लक्ष

बुलडाणा :  कुठलाही साथीचा आजार आल्यास रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या कुपोषित बालकांना हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या ही ३१० आहे, मागील वर्षी पेक्षा यामध्ये १४२ बालकाची वाढ झाली आहे, ह्या बालकांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने कोरोना विषाणूचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक असू शकते त्यामुळे ह्या बालकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. ह्या सर्व बालकांना अंगणवाडी च्या माध्यमातून घरपोच पोषण आहाराचे वाटप करण्यात आले असून त्यांची नियमित तपासणी देखील करण्यात येत आहे.

Related posts

अखिल भारतीय कलाल महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश चौकसे यांची नियुक्ती …

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 334 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 143 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

हिंदुस्तान लिवर कामगार संघटनेची निवडणुक पडली पार

nirbhid swarajya
error: Content is protected !!