बुलडाणा : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या शासनाने दोन दिवसांपूर्वी बदल्या केल्या आहेत. आता जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागातून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच खामगांव येथील रिक्त असलेल्या उपविभागीय अधिकारी पद सुद्धा भरण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उप जिल्हाधिकारी रामेश्वर पुरी यांची अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे रिक्त असलेल्या उपविभागीय अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्या शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर रिक्त झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सक पदी कराड सातारा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन विठ्ठलराव तडस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत झालेल्या 43 बदल्यांमध्ये बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सक पद भरण्यात आले आहे. डॉ. पंडित यांना शेगाव येथे वैद्यकीय अधीक्षक पदी नेमण्यात आले आहे.तर एकीकडे खामगांव येथील महिन्याभरापासुन रिक्त असलेल्या उपविभागिय अधिकारी पदी वाशिम येथील राजेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.