December 29, 2024
आरोग्य खामगाव बुलडाणा राजकीय

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल

खामगांव : अयोध्या येथे काल 5 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असल्याने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कलम 37 (1 व 3) जारी केले होते. त्यामुळे काल सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत अनेक बंधने जिल्हा प्रशासनाने लावली होती. या बंधन व नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासना कडून सांगितले होते.याचेच उल्लंघन करत खामगांव येथील गांधी चौकात फटाके व आतिशबाजी करण्यात आली.
कलम 37 (1) व (3) लागू केल्यामुळे जिल्ह्यात लोकांना सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, चौकात एकत्र येता येणार नाही. कुठेही सार्वजनिक ठिकाणी, चौकात प्रतिमा पूजन, आरती, घोषणा देणे व फटाके फोडता येणार नाही ऐसे सुद्धा प्रशासनाने सांगितले होते.मात्र याचेच उल्लंघन करत काल गांधी चौकात फटाके फोडण्यात आले व श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच श्रीराम यांची ऊंच प्रतिमा लावून व श्रीराम यांचे डिजिटल प्रिंट असलेले चौकोनी बॉक्स तयार करून गांधी चौक येथे उभे करून व त्याच्या आजूबाजूला कुंडया ठेवून रस्ता अडवून रहदारीस अडथळा निर्माण केला. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर मास्क न लावणे, फिजिकल डिस्टनसिंग चे पालन न करणे, तसेच मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन बेकायदेशीर कृत्य करुन आदेशाचे उल्लंघन केले सदर आदेशात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमास परवानगी देऊ नये व त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचित केल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी पो हे का गजानन वाघमारे यांच्या फ़िर्यादी वरून संजय उर्फ मुन्ना पुरवार व इतर पाच ते सहा आरोपीं विरुद्ध कलम 188, 269,341 135, 51 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पी एस आय सराग हे करत आहेत.

Related posts

10 लाख किंमतीचा 1 किंटल गांजा पकडला….

nirbhid swarajya

बुलढाणा उपजिल्हाधिकारी, लिपिक व एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना बुलडाणा एसीबी जाळ्यात…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 295 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 59 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!