बुलडाणा : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर यांच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्ताने महाज्योतीकडुन ऑन लाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा संपुर्ण जिल्हास्तरावर राबविण्यात आली. जिल्हयातील संपुर्ण महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ऑन लाईन निबंधाच्या माध्यमातुन यात सहभाग घेतला.या निबंध स्पधेचे विषय स्त्री-पुरूष समानता, सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, सावित्रीबाई फुले यांचे विचार हे होते. स्पर्धेचे सनियंत्रण महाज्योतीचे समन्वयक अविनाश खिल्लारे, उमेश खराडे यांनी केले तर मुल्यांकन प्रा.सौ प्रियंका देशमुख, सतिश बाहेकर यांनी केले. तसेच विजेत्या स्पर्धकाला क्रमांकाची निवड सहाय्यक आयुक्त् डॉ अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .या स्पर्धचे प्रथम पारीतोषिक कु.पल्लवी गजानन अंभोरे, मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा व्दितीय प्रद्युम्न किसन लोखंडे, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद तर तृतीय क्रमांक कु वैष्णवी महेश ठाकरे, जी. एस. कॉलेज खामगाव यांना मिळाला. सदर विजेत्यांना पारीतोषिक वितरण जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांच्याहस्ते त्यांच्या दालनात करण्यात आले. प्रथम पारीतोषिक दहा हजार रु, व्दितीय पाच हजार व तृतीय दोन हजार पाचशे रुपये होत. त्यानुसार सदर रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड, समाज कल्याण निरीक्षक राजेश खरुले, क.ली प्रणिता बावणकर, तालुका समन्वयक सतिश बाहेकर उपस्थित होते. सर्व विजेत्यांचे जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले .