December 29, 2024
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ५१ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ५१ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ४४४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत १९ कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या १९ असून सध्या रूग्णालयात ४ रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज १ मे रोजी ५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ५१ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ६७ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ४ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ४४४ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

सौजन्य : जिमाका

Related posts

बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अवयव दानाचा संकल्प

nirbhid swarajya

शेतकरी संघटनेच्या खामगाव तालुकाध्यक्षपदी प्रफुल्ल उर्फ हेमंत मुंढे पाटील यांची नियुक्ती

nirbhid swarajya

अवैध दारू विरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई; एका आरोपीस अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!