खामगांव : अंगात धमक अन् मनात जिद्द असली की, अवघड वाटणारी वाट सोपी वाटयाला लागते. हे आपल्या कतृत्वाने सिद्ध केले आहे खामगाव येथील अंकुश गणेश दीवाणे या पंधरा वर्षीय मुलाने. वयाच्या दहाव्या वर्षी पेपर वाटणाऱ्या अंकुशने ५ वर्षाच्या मेहनतीने पैसे जमा करुन त्यातून एक दुचाकी घेतली आहे. खामगाव मधील काही सांज दैनिक व दैनिक हे पेपर अंकुश गेली पाच वर्ष सायकल ने वाटप करत होता,त्यातून त्याने जमा केलेल्या पैशांमधून एक इ- बाईक घेतली आहे.
आता याच इ-बाईक वरून आता पेपर वाटप करणार आहे. अंकुशने पेपर वाटप करून फावल्या वेळेत दूध डेरी वर काम करून खूप मेहनत घेतली आहे. वास्तविक पहाता त्याचे वडील गणेश दीवाणे यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच.अंकुशचे वडील येथील विश्वकर्मा मधे मजूरीचे काम करतात तर आई घरकाम करते. अश्या सर्व परिस्थितीत अंकुश पेपर वाटप करुन व दुध डेरी वर काम करून आपल्या कुटुंबाच सांभाळ तर केलाच पण स्वतःही १० वी चांगल्या मार्काने उत्तीर्ण सुद्धा झाला. आई वडिलांवरच आर्थिक भार किती टाकायचा व स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे या विचाराने अंकुशने वयाच्या १० व्या वर्षी कामाला सुरुवात केली.
ज्या वयात मुल घरात मोबाइल वर गेम खेळतात, टीव्ही पाहतात त्या वयात अंकुश पेपर वाटप करून व दूध डेरी वर काम करून स्वतःच्या हिमतीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचला आहे. अंकुशला शहरातीलच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (ITI) मधे इलेक्ट्रिशियन या विभागात शिकायचे आहे. त्याला शिक्षण तर घ्यायचे आहेच. शिवाय स्वतःच्या पायावर उभेही रहायचे आहे. माणसाच्या अंगात जिद्द व चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट करण्यास अवघड जात नाही, याचेच एक जिवंत उदाहरण अंकुशने दिले आहे. अंकुशच्या या पुढील प्रवासासाठी निर्भिड स्वराज्य परिवाराकडून अभिनंदन व शुभेच्छा….!