संभाजी ब्रिगेड पाठोपाठ जिजाऊ ब्रिगेड ही आक्रमक…
तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून देवेंद्र फडणवीस यांनी हे षडयंत्र घडवलं नसल्याचे सिद्ध करावे-जिजाऊ ब्रिगेडची मागणी
अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन
बुलढाणा-: जिल्ह्यात 12 जानेवारी मा जिजाऊंच्या जन्मदिनानिमित्त आयोजित जन्म सोहळ्यास येणाऱ्या देशभरातील जिजाऊ भक्तांची आठ ते दहा किलोमीटरवर बॅरिगेट लावून पोलिसांनी अडवणूक केली.. त्यामुळे लाखो जिजाऊ भक्त जिजाऊंच्या राजवाड्यावर तसेच जिजाऊ सृष्टीवर जिजाऊंना अभिवादन करण्याकरता पोहोचू शकले नाहीत.. यामध्ये गृह मंत्रालयाचा हात असल्याचा आरोप आता जिजाऊ ब्रिगेड कडून करण्यात आला आहे.त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करावे आणि या संपूर्ण षडयंत्रात आपला हात नसल्याचे सिद्ध करावे अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.. अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिजाऊ ब्रिगेड कडून देण्यात आला आहे.. त्यामुळे आता 12 जानेवारीच्या जिजाऊ जन्म सोहळ्याचा हा वाद शिगेला पोहोचला असून संभाजी ब्रिगेड पाठोपाठ जिजाऊ ब्रिगेडही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.. लवकरात लवकर या संपूर्ण कृत्याला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर राज्यात एक मोठं आंदोलन पाहायला मिळू शकते..अशी माहिती वनिता अरबट आंतर राष्ट्रीय सह संघटक जिजाऊ बिग्रेड, रंजना घिवे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली आहे.